सध्या सगळीकडे गणेशोत्सवचा उत्साह कायम असून आज गणेशोत्सवाचा सहावा दिवस आहे. अनेक घरांमध्ये लाडक्या गणपती बाप्पासोबत गौरीचं आवाहनही मोठ्या जल्लोषात झालं होतं. गौरी आगमनाच्या तिसऱ्या म्हणजे आज काही ठिकाणी गौरी-गणपती विसर्जनाचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या गौराईचं विसर्जन पारंपरिक पद्धतीने, थाटामाटात आणि कोणताही अडथळा न येता पार पडावं, यासाठी प्रत्येक घरात लगबग सुरू आहे. पण गौरी विसर्जन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य नियम आणि काळजी घेतली तर विसर्जन विधी अगदी निर्विघ्नपणे आणि मंगलमय वातावरणात पूर्ण होईल. त्यामुळे गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त व गौरी विसर्जनाची योग्य पद्धत सविस्तररीत्या जाणून घेऊयात..
गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त 2026-
परंपरेनुसार गौरी पूजनाच्या तिसऱ्या दिवशी गौराईला निरोप दिला जातो. आज 19 सप्टेंबर 2026 रोजी गौरी विसर्जनासाठी सकाळपासूनच शुभ मुहूर्त सुरू होत आहे. पंचांगानुसार सकाळी 6 वाजून 27 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 38 मिनिटांपर्यंत विसर्जनासाठी चांगला काळ आहे. मात्र, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मूळ नक्षत्र संपण्यापूर्वी म्हणजेच दुपारी 3 वाजून 15 मिनिटांच्या आत गौरी विसर्जन करणे सर्वात शुभ मानले जाते. त्यामुळे सूर्योदयापासून ते दुपारी 3:15 पर्यंतच्या वेळेत विसर्जनाची विधी पूर्ण करावी.
गौरी विसर्जनापूर्वी-
विसर्जनाच्या वेळी-
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौरी विसर्जनाची नेमकी पद्धत सर्वत्र सारखी नसते. काही घरांमध्ये गौरीसोबत विशिष्ट वस्तू विसर्जित करण्याची किंवा काही वस्तू घरी ठेवण्याची परंपरा असते. त्यामुळे आपल्या कुळाचारानुसार आणि घरच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या विधींमध्ये बदल असू शकतात.