भांडुपमध्येमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या ठिकाणी एका बसने चार ते पाच जणांना चिरडलं, ज्यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात बस नियंत्रणाबाहेर जाऊन घडल्याने घडला असून, यात काही लोक बसखाली चिरडले गेले, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. तर या अपघामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजटी तपासत आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शींकडूनही दुर्घटनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हा अपघात भांडुपमधील वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.