Major Fire Incident In Delhi : दिल्लीत आगीच्या घटना थांबण्याचं नाव घेईना! साखरझोपेत असतानाच पुन्हा भीषण अग्नितांडव

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सतत भीषण आगीच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी 7.20 च्या सुमारास दिल्लीतील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली आहे. 

Major Fire Incident In Delhi : दिल्लीत आगीच्या घटना थांबण्याचं नाव घेईना! साखरझोपेत असतानाच पुन्हा भीषण अग्नितांडव

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सतत भीषण आगीच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच दिल्लीतील मालवीय नगरमध्ये हॉटेलला लागलेल्या आगीत होरपळून तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण त्यात गंभीर जखमी देखील झाले होते.

त्यानंतर कालच 4 जून रोजी बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील 'प्रसाद हॉस्पिटल'मध्ये पहाटे 3 च्या सुमारास आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे भीषण आग लागली. या आगीत होरपळून 10 जणांचा मृत्यू झाला तसेच 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले. या घटनेला दोन दिवस ही झाले नसताना आज सकाळी 7.20 च्या सुमारास दिल्लीतील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली आहे. 

हेही वाचा- Massive Fire At Hospital : दिल्लीतील हॉटेलनंतर बिहारमध्ये रुग्णालयाला भीषण आग; 10 जणांचा होरपळून मृत्यू, 20 जण जखमी

दिल्लीतील नोएडाच्या सेक्टर 74 प्रसिद्ध आयव्ही काउंटी सोसायटीमध्ये 12 व्या मजल्यावरील फ्लॅटमधून अचानक आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या आणि प्रशासनाकडून रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले जात होते. अवघ्या काही क्षणातच संपूर्ण सोसायटी रिकामी झाली.

दरम्यान दिल्लीत वारे वाहत असल्यामुळे ही आग आणखी मोठ्या प्रमाणात पसरली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान दिल्ली-एनसीआरमध्ये आगीच्या घटना एका मागून एक सुरू आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number