उल्हासनगरमधील सेंच्युरी कंपनीत स्फोट

उल्हासनगरमधील सेंच्युरी कंपनीत स्फोट

ठाणे, २३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर – मुरबाड महामार्गाजवळ शहाड येथे सेंच्युरी रेयॉन कंपनीत नायट्रोजन कंटेनरचा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आणि चारजण जखमी झाले. स्फोट एवढा मोठा होता की, एक – दोन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात हादरे जाणवले. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस स्फोट प्रकरणी तपास करत आहेत. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.

शैलेश यादव (२५), सेंच्युरी रेयॉन कंपनीचा कर्मचारी; गंभीर दुखापतीमुळे मृत्यू

जखमींची यादी

१. सागर झालटे (४४), सेंच्युरी रेयॉन कंपनीचा कर्मचारी
२. पंडित मोरे, वाहन चालक
३. प्रकाश निकम (३४), सेंच्युरी रेयॉन कंपनीचा कर्मचारी
४. हंसराज सरोज (५२), वाहन चालकाचा मदतनीस

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version