उच्च न्यायालयाने एसटी संपाबाबत दिलेल्या निर्णयानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संपकारी कर्माचीर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी धडकले. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात दोन्ही पक्षांनी बाजू माडंली असून सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. तसेच सदावर्ते यांचे वकिल महेश वासवानी यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीला विरोध केला आहे.
गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची कोठडी द्या.
सखोल चौकशीसाठी कोठडी हवी.
सदावर्तेंसह इतर आरोपींवरही गंभीर आरोप.
आरोपींवरील कलमं गंभीर.
पवारांच्या घरावरील हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध.
सदावर्तेंना तातडीने जामीन द्यावा.
आरोपी तपासाला प्रभावित करणार नाही.
सदावर्तेंच्या वक्तव्यांचा व्हिडिओ सादर करावा.
घरामध्ये घुसू असं सदावर्तें बोलले नाहीत.
सरकारविरुद्ध बोलल्याने सूडबुद्धीने कारवाई.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.