‘राज्यात २५ हजार मुली-महिला गायब; पोलीस कुठे आहेत?’ -चित्रा वाघ

नाशिकमध्ये एकाच दिवशी चार मुली गायब झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच राज्यात महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना सुरूच आहे. सोमवारी राज्यातील ३ विवाहीत महिलांवर अत्याचाराप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी भाजप नेते चित्रा वाघ यांनी महिला अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यात मुली अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. सोमवारी ३ विवाहीत महिलांवर अत्याचाराच्या घटनेत वाढ […]

‘राज्यात २५ हजार मुली-महिला गायब; पोलीस कुठे आहेत?’ -चित्रा वाघ

नाशिकमध्ये एकाच दिवशी चार मुली गायब झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच राज्यात महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना सुरूच आहे. सोमवारी राज्यातील ३ विवाहीत महिलांवर अत्याचाराप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी भाजप नेते चित्रा वाघ यांनी महिला अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.

राज्यात मुली अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. सोमवारी ३ विवाहीत महिलांवर अत्याचाराच्या घटनेत वाढ तर राज्यातील २५ हजार मुली, महिला गायब झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नेमके काय चालू आहे? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. शहरातील मुली अपहरण होत असताना विवाहित महिलांवरील देखील अत्याचाराच्या घटनेत वाढ आहे. मात्र याप्रकरणी पोलीस यंत्रणा कुठे आहे? असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आधी पोलीस आयुक्त गायब झाले, नंतर गृहमंत्री गायब झाले आणि आता मुख्यमंत्रीही गायब झाले आहेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

तसेच नाशिक जिल्ह्यात खून आणि दरोडा टाकण्याचे प्रमाणाही वाढत आहे. तसेच चोरी करण्याच्या घटनाही घडत आहे. मात्र पोलीस काय करत आहेत? असाही सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number