नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मध्ये झोमॅटोच्या महिला कर्मचाऱ्याच्या बाईक वर वाशी वाहतूक विभागातर्फे कारवाई करत असताना सदर महिला धावत आली. पण व्हिडिओ शूटिंग करत असल्याने ती महिला आणखीन भडकली आणि तिने वाहतूक पोलिसांना आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ द्यायला सुरुवात केली. या महिलेला इतर नागरिकांनी जाण्यास सांगितले मात्र नंतर वाशी पोलिसांनी तिला अटक केली. या महिलेवर शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल केलाय. या महिलेने चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.