व्यवसायिकाच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्री झीनत अमान यांनी केली जुहू पोलिसांकडे तक्रार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबईहिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी विनयभंगाप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सरफराज उर्फ अमन खन्ना नावाच्या तरुणावर झीनत यांनी गुन्हा दाखल केला आहे. सरफराज उर्फ अमन खन्ना हा एक बिझनेसमन असून झीनत अमान यांनी त्यांच्या विरोधात विनयभंग आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे.  झीनत अमान यांनी जुहू पोलिस ठाण्यात  […]

व्यवसायिकाच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्री झीनत अमान यांनी केली जुहू पोलिसांकडे तक्रार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी विनयभंगाप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सरफराज उर्फ अमन खन्ना नावाच्या तरुणावर झीनत यांनी गुन्हा दाखल केला आहे. सरफराज उर्फ अमन खन्ना हा एक बिझनेसमन असून झीनत अमान यांनी त्यांच्या विरोधात विनयभंग आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

 झीनत अमान यांनी जुहू पोलिस ठाण्यात  तक्रार नोंदवली आहे. 68 वर्षीय झीनत अमान यांच्या आरोपानुसार, सरफराज यांनी 27 जानेवारी रोजी त्यांच्या बिल्डिंगखाली येऊन त्यांना धमकावलं. तसेच, सुरक्षारक्षकाशीही गैरवर्तन करुन त्याला मारहाणदेखील केली.

Zeenat-Aman2.jpg

आरोपी सरफराज काही दिवसांपासून झीनत अमान यांचा पाठलाग करत होता. तसेच, व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेजही पाठवत असल्याचा आरोप झीनत अमान यांनी केला आहे.

पोलिसांनी सरफराजविरोधात 354 (ड) (पाठलाग करणं), 509 आयटी अॅक्ट (महिलेला धमकी देणं) तसेच, इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सरफराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी पळ काढला, सध्या तो पसार असून जुहू पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

38 वर्षीय आरोपी सरफराज एकेकाळी फिल्ममेकर होता. तसेच काहींच्या मते, तो रिअल इस्टेटच्या व्यवसायात सक्रीय आहे. तर मानसिकदृष्ट्या अस्थिर असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं काहींनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number