यवतमाळमध्ये एक थरारक दुर्घटना घडली. महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी तान्हा पोळ्याच्या निमित्ताने जत्रा भरवण्यात आली होती. यात विविध मनोरंजन कार्यक्रमे सुरु होती, त्यातील आकाश पाळण्यात एक चिंताजनक प्रकार घडला. 25 वर्षीय बाली मारुती टाळीकोटे तरुणी ही आकाश पाळण्यात बसली होती, पाळणा सुरु झाला तेवढ्यात तिचे केस वरच्या बाजूतील बेअरिंगमध्ये अडकले. त्यामुळे या फिरत्या आकाश पाळण्यामुळे तिचे केस जोरात खेचले गेले, म्हणून केसांसह तिची चामडी देखील सरसकट निघून आली.
या दुर्घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे यांच्या तत्परतेने व जमादार सुहास काय यांनी नागरिकांच्या मदतीने पाळणा थांबवला गेला, तिची सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच मोठा अनर्थ टळला