भाजपच्या बंडखोर नेत्याच्या शेतकरी आंदोलनाला शरद पवार, उद्धव ठाकरेंसह सर्वपक्षीय विरोधकांचा जाहीर पाठिंबा

भाजपच्या बंडखोर नेत्याच्या शेतकरी आंदोलनाला शरद पवार, उद्धव ठाकरेंसह सर्वपक्षीय विरोधकांचा जाहीर पाठिंबा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अकोल्यात यशवंत सिन्हा यांनी कापूस उत्पादकांसाठी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला उद्धव ठाकरे, शरद पवारांसह सर्वपक्षीय विरोधकांनी जाहीर पाठिंबा दिल्याने, हे आंदोलन आता चांगलेच चर्चेत आलंय.

भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले, महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी तर थेट आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतलीय.

तर, आमदार बच्चू कडू यांनी भेट देऊन आम्ही सुद्धा आंदोलनात सहभागी असल्याचं म्हटलंय. नाफेडने शेतकऱ्यांच्या कापसाची शंभर टक्के खरेदी करावी, यासाठी यशवंत सिन्हा अकोल्यात ठाण मांडून बसलेत. अकोल्यातील शेतकरी जागर मंचाने यशवंत सिन्हांच्या नेतृत्वात कालपासून हे आंदोलन सुरू केलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version