गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूने शिरकाव केलाय. जानेवारीत एक, जुलैमध्ये पाच आणि ऑगस्ट महिन्यात अचानकपणे 31 रुग्ण आढळलेत, त्यामुळं शहरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, त्यामुळं शहरवासीयांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. असं महापालिका प्रशासनानं आवाहन केलंय. गेल्या सहा वर्षात 2022 मध्ये 58 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती, तेंव्हा ही ऑगस्टमध्ये 34 रुग्ण आढळले होते.
त्यानंतर 2024मध्ये 15 रुग्णांना लागण झाली होती आणि आता पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोकं वर काढलंय. मात्र गेल्या सहा वर्षाचा ट्रेंड पाहता, पॅनिक होण्याची गरज नाही. मात्र गणेशोत्सवानिमित्त होणाऱ्या गर्दीत जाणं टाळावं, शक्यतो मास्क वापरावा, हात स्वच्छ धुवावेत. त्यानंतर ही सर्दी, खोकला, ताप आल्यास पालिका रुग्णलयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.