Ayodhya Mandir Museum: अयोध्येत 52 एकरावर उभारण्यात येणार जागतिक दर्जाचे ‘मंदिर संग्रहालय’

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यास हिरवा कंदील देण्यात आला.
Ayodhya Mandir Museum: अयोध्येत 52 एकरावर उभारण्यात येणार जागतिक दर्जाचे ‘मंदिर संग्रहालय’

Ayodhya Mandir Museum: उत्तर प्रदेश सरकार आणि टाटा सन्स यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारानंतर अयोध्येत 52.102 एकर जागेवर जागतिक दर्जाचे ‘मंदिर संग्रहालय’ उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यास हिरवा कंदील देण्यात आला. या निर्णयामुळे अयोध्येला जागतिक पातळीवर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शहर म्हणून नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Winter Session 2025: संसदेत वंदे मातरम आणि SIR वर 'या' दिवशी होणार चर्चा; सरकारकडून 10 तासांची वेळ निश्चित

मूळ 25 एकरांवरून प्रकल्पाचा विस्तार 52 एकरांपर्यंत

राज्याचे अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी सांगितले की, सुरुवातीला हा प्रकल्प अयोध्येतील मांझा जामथरा गावातील 25 एकर नझुल जमिनीवर प्रस्तावित होता. परंतु संग्रहालयाचे आकारमान आणि जागतिक दर्जाचे स्वरूप लक्षात घेऊन टाटा सन्सने अतिरिक्त जमिनीची मागणी केली. सरकारने त्यांची मागणी मान्य करत प्रकल्पासाठी अजून 27.102 एकर जमीन जोडली असून आता संग्रहालय एकूण 52.102 एकरांवर उभारले जाईल. ही जमीन गृहनिर्माण व नगररचना विभागाकडून पर्यटन विभागाला मोफत हस्तांतरित केली जाईल आणि पुढे 90 वर्षांसाठी टाटा सन्सकडे उपलब्ध राहील.

हेही वाचा – PMO Office Name Change: पंतप्रधान कार्यालय आणि राजभवनांच्या नावात मोठा बदल; आता 'या' नावाने ओळखली जाणार दोन्ही कार्यालये

CSR निधीतून बांधकाम 

टाटा सन्सने त्यांच्या CSR निधीतून हे अत्याधुनिक मंदिर संग्रहालय विकसित व चालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अंतर्गत एक ना-नफा संस्था स्थापन केली जाणार आहे. या संस्थेच्या व्यवस्थापनात केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी देखील सहभागी असतील. दरम्यान, प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करण्यासंदर्भात 3 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि टाटा सन्स यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) झाला असल्याची माहितीही वित्तमंत्री खन्ना यांनी यावेळी दिली.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version