महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा गुरुवारपासून सांगलीत आयोजित करण्यात आली आहे. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून राज्यभरातून चारशेवर महिला मल्ल सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे. पहिल्यांदाच सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे. प्रथम महिला कुस्तीगीरांची […]

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा गुरुवारपासून सांगलीत आयोजित करण्यात आली आहे. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून राज्यभरातून चारशेवर महिला मल्ल सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे. पहिल्यांदाच सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे.

प्रथम महिला कुस्तीगीरांची वजने घेतली जातील. त्यानंतर आज सायंकाळी आणि दुसऱ्या दिवशी स्पर्धा होतील. उद्या २४ मार्चला सायंकाळी सहा वाजता अंतिम कुस्ती होईल. स्पर्धेसाठी राज्यभरातून ४५ संघांतून सुमारे ४०० ते ४५० स्पर्धक सहभागी होत आहेत. महापालिकेच्या संघांचाही सहभाग आहे. राज्यभरातील संघांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. विजेत्यांना चांदीची गदा आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६८, ७२ आणि ७६ वजनी गटातील महिला कुस्तीगीर सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरीसाठी ६५ वजनी गटावरील मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत ४५ जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा देण्यात येणार आहे.

सांगलीतील स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दोन आखाडा तयार करण्यात आले आहेत. मंडप, महिला मल्लांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था झाली आहे. प्रशिक्षक, पंचाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संकुलाच्या मैदानावर मंडप घालण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number