बाळाला कोवळं ऊन देण्यासाठी ‘ती’ गच्चीवर घेऊन गेली अन…

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद बिल्डींगच्या गच्चीवरुन खाली पडल्याने आई आणि बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडलीय. रोहिणी भंडारी असे या महिलेचे नाव आहे. रोहिणी बाळंतपणासाठी औरंगाबाद शहरातील गारखेड परिसरातील मुथा कॉम्प्लेक्स मधील आपल्या माहेरी आल्या होत्या. बाळाला कोवळ उन मिळावं यासाठी त्या बाळाला घेऊन गच्चीवर गेल्या होत्या. त्याचवेळी कॉम्प्लेक्सच्या मागच्या बाजूला रोहिणी खाली पडल्याचा […]

बाळाला कोवळं ऊन देण्यासाठी ‘ती’ गच्चीवर घेऊन गेली अन…

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

बिल्डींगच्या गच्चीवरुन खाली पडल्याने आई आणि बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडलीय. रोहिणी भंडारी असे या महिलेचे नाव आहे. रोहिणी बाळंतपणासाठी औरंगाबाद शहरातील गारखेड परिसरातील मुथा कॉम्प्लेक्स मधील आपल्या माहेरी आल्या होत्या. बाळाला कोवळ उन मिळावं यासाठी त्या बाळाला घेऊन गच्चीवर गेल्या होत्या. त्याचवेळी कॉम्प्लेक्सच्या मागच्या बाजूला रोहिणी खाली पडल्याचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला.

त्यानंतर तातडीने रोहीणीला उपचारासाठी तत्काळ सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आणि बाळाला एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. दोघानांही डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर शहरात खळबळ उडालीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number