जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
घाटकोपरच्या नवरोजी लेनजवळ एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर केमीकल हल्ल्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी 4 जणांना अटक केलीय.
प्रवीण धुमाळनं पीडीत तरुणीला धमकावून रिक्षात बसवण्यासाठी सांगितलं. ती रिक्षात बसली नाही या रागात बॉटलमधील केमिकल तिच्यावर फेकण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने बाटली हातातून खाली पडल्यानं तिच्या अंगावर केमिकल पडले नाही , त्यामुळे तिला कोणतीही इजा झाली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.