नागपुरात महिलेचा घरातच खून; परिसरात खळबळ

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागातील असिस्टंट प्रोफेसर महिलेचा खून झाला आहे. विशेष म्हणजे हा खून घरातच करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नागपुरात महिलेचा घरातच खून; परिसरात खळबळ

नागपुर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागातील असिस्टंट प्रोफेसर महिलेचा खून झाला आहे. विशेष म्हणजे हा खून घरातच करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह घरात आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक तपासात महिलेच्या डोक्यावर रॉडने वार करून तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून हुडकेश्वर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

नागपुरात घरातच महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत महिलेचे नाव अर्चना अनिल राहुले असून त्या लाडेकर ले-आउट, हुडकेश्वर येथे राहत होत्या. अर्चना यांचे पती अनिल राहुले हे रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. ते आठवड्यातून एक ते दोन दिवस नागपुरात येत असतात. शनिवारी सायंकाळी अनिल नागपुरात आले. घरी पोहोचल्यानंतर त्यांना घरातून दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाली. घरात गेल्यानंतर त्यांना पत्नी अर्चनाचा मृतदेह बेडजवळ पडलेला दिसला. त्यांच्या डोक्यात रॉडने मारण्यात झाल्यामुळे मृतदेहाच्या शेजारी सुकलेले रक्त दिसून आले. त्यांनी ही माहिती शेजाऱ्यांना दिल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना हा प्रकार सांगितला. हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मृत अर्चना यांना त्यांच्या पश्चात पती आणि मुलगा आहे. मुलगा करीमनगर येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. 

हेही वाचा : राज्य सरकारकडून आंबेडकर जयंतीनिमित्त टूर सर्कीट सहलीचे आयोजन; कोणत्या शहरात जाणार सहल?

नागपुरात असिस्टंट प्रोफेसर अर्चना यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस अर्चना यांच्या खूनाचा शोध घेत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number