फरीदाबादमध्ये चालत्या गाडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार

फरीदाबादमध्ये चालत्या गाडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था, फरीदाबाद

फरीदाबादमध्ये चालत्या गाडीत एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडलीय. तरुणी शनिवारी सायंकाळी ऑफिसमधून घरी परतत असताना स्कॉर्पियो गाडीतून आलेल्या 3 युवकांनी तिचे अपहरण केले.

बलात्कारानंतर हे नराधम युवतीला हायवेवरच सोडून फरार झाले. प्रत्यक्षदर्शींनी घटनेबाबत पोलिसांना सूचना दिली. पोलीस लोकेशनच्या सहाय्याने त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते.

मात्र, तोपर्यंत नराधम युवतीला हायवेवर सोडून पसार झाले. विशेष तपास पथकाची स्थापना करत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version