Moshi Garbage Depot Tragedy: मोशी कचरा डेपो दुर्घटना! पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही जीवन संपवलं; ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर, नातेवाइकांचा दावा

मोशी कचरा दुर्घटनेत पतीच्या मृत्यू झाल्यानंतर, कौटुंबिक छळाला कंटाळून त्यांची पत्नी सोनाली गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात महत्त्वाची अपडेट समोर आलीय.

Moshi Garbage Depot Tragedy: मोशी कचरा डेपो दुर्घटना! पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही जीवन संपवलं; ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर, नातेवाइकांचा दावा

पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील कचरा दुर्घटनेत पती नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानंतर, कौटुंबिक छळाला कंटाळून त्यांची पत्नी सोनाली गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पतीच्या मृत्यूनंतर शासनाकडून मिळालेल्या 20 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीच्या वाटपावरून सासरच्या मंडळींकडून सोनाली यांचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप सोनाली यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. मदतीच्या रकमेवरून वाद निर्माण करून सोनाली यांच्यावर सातत्याने दबाव आणला जात होता, ज्याला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या आई-वडिलांनी केला आहे.

हेही वाचा- Nagesh Gaikwad Wife Dies: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील नागेश गायकवाड यांच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; चिमुकली श्रेया झाली पोरकी

सासरच्यांवर कारवाईची माहेरच्यांची मागणी
पतीपाठोपाठ आईनेही जगाचा निरोप घेतल्याने गायकवाड दाम्पत्याच्या दोन निष्पाप चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र पूर्णपणे हरपले असून त्या पूर्णपणे अनाथ झाल्या आहेत. या दुहेरी दुःखाच्या डोंगरामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोनाली यांच्या मृत्यूला पूर्णपणे सासरची मंडळीच जबाबदार असून पैशांच्या हव्यासापोटी एका तरुण आईचा बळी घेण्यात आल्याचा आरोप करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सोनाली यांच्या पालकांनी केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number