WHO Dismissed Trump’s Claim: ‘गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉल गोळ्या टाळाव्यात…’; WHO ने फेटाळला ट्रम्पचा दावा

ट्रम्प यांनी दावा केला होता की, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल घेतल्यास मुलांमध्ये ऑटिझम आणि ADHD (अटेंशन डेफिसिट हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर) होण्याचा धोका वाढतो.<br/>
WHO Dismissed Trump’s Claim: ‘गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉल गोळ्या टाळाव्यात…’; WHO ने फेटाळला ट्रम्पचा दावा

WHO Dismissed Trump's Claim: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉल वापरू नये असा सल्ला दिला होता. ज्यावर जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी दावा केला होता की, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल घेतल्यास मुलांमध्ये ऑटिझम आणि ADHD (अटेंशन डेफिसिट हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर) होण्याचा धोका वाढतो.

दरम्यान, WHO ने ट्रम्पचा दावा फेटाळून लावला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलमुळे ऑटिझमचा धोका वाढतो, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. WHO ने स्पष्ट केले की डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पॅरासिटामॉल सुरक्षित आहे. WHO चे प्रवक्ते तारिक जसारेविक यांनी जिनेव्हा येथील पत्रकार परिषदेत सांगितले, वैज्ञानिक दृष्टिकोनातून असे काहीही सिद्ध झालेले नाही की पॅरासिटामॉलमुळे ऑटिझम होतो. विज्ञानाने जे सांगितले आहे तेच मान्य करायला हवे. युरोपियन मेडिसिन एजन्सीनेही ट्रम्पच्या दाव्यांचा आधार घेतलेला कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – US Visa : अमेरिकेला जाण्यासाठी H-1B व्हिसा मिळाला नाही म्हणून 'या' पठ्ठ्याने लढवली शक्कल, नेमकं केलं तरी काय?

ट्रम्प यांनी गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल वापरणे टाळण्याचा सल्ला दिला असून अमेरिकन अन्न व औषध प्रशासन (FDA) गर्भवतींसाठी अ‍ॅसिटामिनोफेनच्या लेबलवर इशारा देईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. तथापि, FDA ने अद्याप असा इशारा जारी केलेला नाही आणि ट्रम्पच्या दाव्यांना कोणतेही वैज्ञानिक समर्थन नाही, असे आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Jayshankar meet Marco Rubio : टॅरिफ, एच-1बी व्हिसा…अशातच परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची अमेरिकेतील बड्या नेत्याशी चर्चा

याशिवाय, ट्रम्प यांनी ऑटिझम बरा करू शकणारे चमत्कारिक औषध शोधल्याचा दावा केला असून, हे अभियान अमेरिकेचे आरोग्य सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्या नेतृत्वाखाली चालवले जात असल्याचं म्हटलं आहे. अनेक आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ट्रम्पचे दावे अतिशयोक्तीपूर्ण आहेत आणि यावरून गर्भवती महिलांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version