राजकारणातील घडामोडी क्षणार्धात नवे वळण घेत असतात. आणि सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणातील सुरु असलेल्या हालचाली सर्वानाच पेचात पाडणाऱ्या ठरत आहेत. शरद पवारांनी राजीनामा दिल्याची घोषणा केल्यांनतर अनेक विश्लेषकांच्या मतांवरून हे पद सुप्रिया यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता दिऊन येत आहे. आणि याच शक्यतेमुळे दादा गट सध्या हादरला आहे. तर अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना वेगळीच धास्ती भरल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही पक्षाने अंतर्गत वाद आणि गटभेद कितीही दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही ते कधी ना कधी डोके वर काढून जनतेसमोर येतच असते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कितीही एकजूटपणा दाखवला असला तरीही त्यातही ताई गट, दादा गट आणि या सगळ्याच्या पलीकडेही राष्ट्रवादीतील शरद पवारांचा गट असे तीन गट असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादीतील ताई गटाचे मोहरे कोण?
राष्ट्रवादीतील सध्याच्या अध्यक्षपदाचा चेहरा मोहरा असणाऱ्या सुप्रिया सुळे यांचासुद्धा पक्षातल्या पक्षात एक वेगळा गट असल्याचे समोर येत आहे. तर, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे – पाटील, जितेंद्र आव्हाड हे सुप्रिया सुळे म्हणजेच ताई गटातील मोहरे आहेत.
राष्ट्रवादीतील दादा गटाचे मोहरे कोण?
स्वतःला शरद पवारांचे वारस समजत असणाऱ्या अजित पवारांना अध्यक्षपद सुप्रिया सुळेंकडे जाण्याची सध्या धास्ती भरली आहे. आणि यातही राष्ट्रवादी पक्षात कार्यरत असताना अजित पवारांच्या दादा गटात धनंजय मुंडे, सुनील तटकरे, नरहरी झिरवाळ, अण्णा बनसोडे असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे मोहरे कोण?
राष्ट्रवादी पक्षाचे करता धरता असणाऱ्या शरद पवारांचाही आतल्या वाटत एक वेगळा गट असल्याचे समोर आले आहे. तर, शरद पवारांच्या या गटात प्रफुल्ल पटेल, हेमंत टकले, विद्या चव्हाण, फौजिया खान यांचा समावेश आहे.