Sai Tamhankar : ‘ते मराठी कलाकारांना फाट्यावर मारतात …’; सई ताम्हणकरने नेमका कोणावर साधला निशाणा?

एका विशेष चर्चासत्रात सईने मराठी इंडस्ट्रीतील 'ग्लॅमर'मागील काळी बाजू मांडली असून, आपल्याच लोकांकडून मराठी कलाकारांना कशाप्रकारे 'फाट्यावर' मारले जाते, याचे दाहक वास्तव तिने समोर आणले आहे.<br/>
Sai Tamhankar : ‘ते मराठी कलाकारांना फाट्यावर मारतात …’; सई ताम्हणकरने नेमका कोणावर साधला निशाणा?

Sai Tamhankar: मराठी मनोरंजन विश्वात अनेक दिग्गज कलाकार असूनही त्यांना हक्काचा सन्मान मिळत नाही, ही खदखद आता अभिनेत्री सई ताम्हणकरने बोलून दाखवली आहे. एका विशेष चर्चासत्रात सईने मराठी इंडस्ट्रीतील ‘ग्लॅमर’मागील काळी बाजू मांडली असून, आपल्याच लोकांकडून मराठी कलाकारांना कशाप्रकारे ‘फाट्यावर’ मारले जाते, याचे दाहक वास्तव तिने समोर आणले आहे.

बॉलिवूडच्या प्रभावाखाली मराठी अस्मिता हरवली?

प्रसिद्ध निर्माते सुहृद गोडबोले यांनी आयोजित केलेल्या एका ऑनलाइन चर्चासत्रात सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले या अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. यावेळी सईने पुरस्कार सोहळ्यांमधील (Award Functions) अनुभव सांगताना इंडस्ट्रीचे वाभाडे काढले. सई म्हणाली, ‘मराठी पुरस्कार सोहळ्यांमध्ये जेव्हा एखादा बॉलिवूडचा कलाकार येतो, तेव्हा तिथले वातावरण पूर्णपणे बदलते. आपलेच लोक त्यांच्यासमोर इतका लाळघोटेपणा करतात की, जे मराठी कलाकार 20-20 वर्षे या इंडस्ट्रीसाठी झटत आहेत, त्यांना कोणी विचारतही नाही. त्यांना अक्षरशः फाट्यावर मारले जाते. अशा वेळी आपल्याला खूप लहान असल्यासारखे वाटते.’

हेही वाचा – Natarang Movie: अतुल कुलकर्णीला नव्हे तर भावोजींना ‘नटरंग’साठी होती ऑफर; रवी जाधवांचा धक्कादायक खुलासा

जे आपलं आहे, त्याला सेलिब्रेट करायला शिका

सईने पुढे आपली खंत व्यक्त करताना सांगितले की, जोपर्यंत आपण आपल्याच दिग्गजांचा आणि कलाकृतींचा सन्मान करणार नाही, तोपर्यंत इतरांकडून आदराची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. तुमच्याकडे जे उत्तमोत्तम कलाकार आहेत, त्यांना मोकळ्या मनाने साजरं करायला शिका. जर आपलीच माणसं आपल्याला अशी वागणूक देणार असतील, तर आपण बाहेरच्यांकडे काय तक्रार करणार? असा परखड सवाल तिने उपस्थित केला आहे.

हेही वाचा – Shreyas Talpade: श्रेयस तळपदे बिग बॉसच्या घरात? वाढत्या चर्चांवर अखेर अभिनेत्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, ‘दुर्दैवाने कलाकार हे…’

चर्चेला उधाण

मराठी सिनेसृष्टीत सई ताम्हणकर हे खूप मोठे नाव आहे. अशा आघाडीच्या अभिनेत्रीने थेट इंडस्ट्रीतील अंतर्गत राजकारण आणि मानसिकतेवर प्रहार केल्यामुळे आता सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. अनेक चाहत्यांनी सईच्या या भूमिकेचे समर्थन केले असून, मराठी कलाकारांना सन्मान मिळायलाच हवा, अशी भूमिका घेतली आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version