न्यायालय नक्की काय म्हणाले?

न्यायालय नक्की काय म्हणाले?

न्यायालय काय म्हणाले?

  • नाबाम रेबिया प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग
  • आमदारांच्या अपात्रतेबाबत आम्ही निर्णय करू शकत नाही
  • आमदारांना अपात्र ठरवावे, अशी कोणतीही विशेष परिस्थिती उद्भवलेली नाही
  • विधानसभा अध्यक्षांनीच समाधानकारक कालावधीत अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा
  • अपात्रतेची याचिका प्रलंबित असतानाही आमदारांचे सर्व हक्क अबाधित राहतील
  • संबंधित आमदार सभागृहाच्या कामकाजातही सहभागी होऊ शकतात
  • प्रतोदाची नियुक्ती विधिमंडळ पक्ष नव्हे तर राजकीय पक्ष करतो
  • विधिमंडळातील मतदानातला सहभाग अथवा अनुपस्थिती याचे निर्देश राजकीय पक्षच देऊ शकतो
  • ३ जुलै २०२२ रोजी विधानसभा अध्यक्षांनी केलेली प्रतोद नियुक्ती बेकायदेशीर आहे
  • शिवसेना नामक राजकीय पक्षाच्या शिफारसीनुसारच विधानसभा अध्यक्षाने प्रतोद नियुक्त करावा
  • शिवसेनेचा प्रतोद नियुक्त करण्यापूर्वी पक्ष घटनेचा अभ्यास आणि तथ्यांची तपासणी करावी
  • विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत
  • वेळ पडल्यास निवडणूक आयोग पक्ष आणि चिन्हाच्या निश्चितीबाबत स्वतंत्र चौकशी करू शकतो
  • अपात्रतेचा निर्णय घेण्यापूर्वी विधिमंडळात खरी शिवसेना कुठली याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा
  • बहुमताची चाचणी करण्यास सांगण्याचे आदेश समर्थनीय नाहीत
  • कारण राज्यपालांसमोर त्या निर्णयास पोषक वातावरण निर्माण झाल्याचे पुरावे नव्हते
  • मात्र, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आम्हाला ठेवता येणार नाही
  • कारण, उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिला
  • ठाकरेंनी राजीनामा दिल्याने शिंदेंना सत्ता स्थापनेसाठी बोलावण्याचा राज्यपाल कोश्यारी यांचा निर्णय समर्थनीय ठरतो

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version