Weather Update: महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट! हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी; वादळी पावसासह ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता

महाराष्ट्रात अनेक भागांत आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसणार असून हवामान विभागाकडून आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज घाटमाथ्याच्या परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.

Weather Update: महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट! हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी; वादळी पावसासह ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता

महाराष्ट्रात अनेक भागांत आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसणार असून हवामान विभागाकडून आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज घाटमाथ्याच्या परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. शहर, उपनगरांसह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज वर्तावण्यात आला आहे. घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भासह जळगाव, नाशिक आणि पुण्यात हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

हेही वाचा- Nagpur Crime : नागपूर हादरलं! काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर मध्यरात्री फायरिंग; घराच्या काचा फुटल्या, संपूर्ण कुटुंब घरी अन्…

यावेळी मुंबईसह नवी मुंबई आणि पालघर, पनवेल, ठाण्यात हवामान कोरडे, दमट आणि उष्ण राहण्याचा अंदाज आहे. तर कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहरासह जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. काल दुपारी 12 वाजल्यापासून शहर व परिसरात वेगवान वाऱ्यासह मध्यम सरींचा पाऊस होता. दरम्यान नाशिकमध्ये शहरात 2.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये  काही ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्याचसोबत विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता असून दमट आणि उष्ण हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number