Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा यू-टर्न! पुढील काही तासांत जोर वाढण्याची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तावला आहे. राज्यात गेले काही दिवस पावसाचा जोर ओसरलेला पाहायला मिळाला.

Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा यू-टर्न! पुढील काही तासांत जोर वाढण्याची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तावला आहे. राज्यात गेले काही दिवस पावसाचा जोर ओसरलेला पाहायला मिळाला, मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होऊ शकतो.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान या भागांत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः पावसाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात पुढील काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हेही वाचा- Crime News : एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या! मगं त्याच घरात आंघोळ अन् जेवण; सैतानालाही लाजवेल असं हत्याकांड

अशातच मुंबईसह कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तावण्यात आला आहे. दरम्यान पालघर, ठाणे, पनवेल आणि नवी मुंबईत मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळसह भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number