Weather update : ज्याची भीती होती तोच हवामान अंदाज समोर! महाराष्ट्रातून पाऊस गायब? आजचा IMD अंदाज काय?  

राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्वच विभागांत एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे सप्टेंबर महिन्यातील एकूण पावसाची सरासरी कमी राहण्याची शक्यता आहे.

Weather update : ज्याची भीती होती तोच हवामान अंदाज समोर! महाराष्ट्रातून पाऊस गायब? आजचा IMD अंदाज काय?  

यंदा राज्यात पावसाचा प्रभाव कमी पाहायला मिळाला. पावसाळा सुरु होऊन तीन महिने ओलांडली आहेत. जूलै ते ऑगस्टदरम्यान पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता राज्यातून माघार घेतल्याचे दृष्य आहे. यंदाच्या मॉन्सूनवर एल निनोचे संकट असल्याचे सांगितले जात होते. राज्यात मान्सूनचा जोर आता कमी झाला असून शेतकऱ्यांसह अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

राज्यात कोणत्याही विभागासाठी पावसाचा मोठा अलर्ट नसल्याने पुढील काही दिवस हवामान बदलत्या स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण, तर काही भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. त्यामुळे राज्यातील पावसाची तूट आणि खरीप पिकांवरील संकट अधिक गंभीर होताना दिसत असून, चांगला पाऊस होणार की नाही, याकडे शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्‍यता नसल्याचा अंदाज नुकताच भारतीय हवामान विभागाने दिला. राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्वच विभागांत एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे सप्टेंबर महिन्यातील एकूण पावसाची सरासरी कमी राहण्याची शक्यता आहे. तर 13 सप्टेंबरला काही भागात सुरुवात झाल्यानंतर 14 सप्टेंबरपासून राज्यातील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.
हेही वाचा- Hingoli Accident : हिंगोलीत मन हेलावणारी दुर्घटना! रिक्षा अन् पिकअपची भीषण धडक; चार जणं दगावले, एक गंभीर जखमी

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण 
वाशिमच्या कारंजा तालुक्यात काही भागात सव्वा महिन्याहून अधिक काळ पावसाने दांडी मारल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या पावसाच्या भरवशावर पेरणी केलेली खरीप पिके आता पावसाअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शेतांमध्ये पिकांची पाने वाळून करपली असून, जमिनीतील ओलावाही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. कापूस, सोयाबीन, तूर यांसह विविध खरीप पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे. मात्र पाऊस आणखी काही दिवस लांबला तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.पिके वाचविण्यासाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला असून, प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

तळ कोकणात सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यात समुद्रकिनारी भागात व सह्याद्रीच्या पट्ट्यात पावसाची संततधार  पाहायला मिळते. हवामान विभागाने या आठवड्यात जिल्ह्यात काही तालुक्यात हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील त्याचबरोबर पुढील आठवड्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या भात शेती अंतिम फुलोऱ्यावर आल्याने पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्यास शेतीवर परिणाम होऊ शकतो. सकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी काल रात्री व पहाटेपासून पावसाची संततधार जिल्ह्यात पाहायला मिळाली. गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पावसाच्या सरी कोसळल्यास त्याचा बाजारपेठांवर परिणाम होऊ शकतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number