Weather Update : मुसळधार पाऊस, वादळी वारे अन् गारपीट! महाराष्ट्रावर तिहेरी संकट, पुढील 24 तासांसाठी हवामान खात्याचा इशारा

राज्यात 20 ऑगस्ट रोजी अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. राज्यात पाऊस कमी अधिक कोसळताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.

Weather Update : मुसळधार पाऊस, वादळी वारे अन् गारपीट! महाराष्ट्रावर तिहेरी संकट, पुढील 24 तासांसाठी हवामान खात्याचा इशारा

राज्यात 20 ऑगस्ट रोजी अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. राज्यात पाऊस कमी अधिक कोसळताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

यावेळी भारतीय हवामान विभागाने राज्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला. हरदोई, कर्नाल या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असला तरी राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. पुढील काही तासांत स्थानिक पातळीवर पावसाची तीव्रता वाढू शकते. 

हेही वाचा- Gold Mine Collapse: अचानक हाहाकार माजला! सोन्याची खाण कोसळून 100 कामगारांचा जागीच मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली?

यावेळी मुंबईसह नवी मुंबई, पालघर, पनवेल आणि ठाण्यात हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असली तरी या सर्व जिल्ह्यांमध्ये कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही विजांसह पावसासाठी पोषक हवामान कायम आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर, धाराशिव बीड आणि नांदेड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number