Maharashtra Weather Update : कोकणासह राज्यात ‘या’ भागांमध्ये पावसाच्या सरी बरसणार; हवामान विभागाचा काय आहे अंदाज? जाणून घ्या

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह कोकणात पावसाचे पुनरागमन झाले असून आजदेखील कोकणात पावसाच्या हलक्या सरी बसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठावाड्यात पावसाने पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र आज कोकणासह मध्य महाराष्ट्रातही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैऋत्य राजस्थान आणि कच्छ परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र […]

Maharashtra Weather Update : कोकणासह राज्यात ‘या’ भागांमध्ये पावसाच्या सरी बरसणार; हवामान विभागाचा काय आहे अंदाज? जाणून घ्या

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह कोकणात पावसाचे पुनरागमन झाले असून आजदेखील कोकणात पावसाच्या हलक्या सरी बसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठावाड्यात पावसाने पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र आज कोकणासह मध्य महाराष्ट्रातही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैऋत्य राजस्थान आणि कच्छ परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे आला असून, या कमी दाब प्रणालीपासून उदयपूरय, रायसेन, पेंद्रारोड, रांची, दिघा ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 1.5 ते 5.8 किलोमीटर उंचीदरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

हेही वाचा : Today's Horoscope 2026: गणरायाच्या कृपेने कोणाची होणार प्रगती? पैसा, करिअर आणि प्रेमात मिळणार खुशखबर; वाचा आजचे राशिभविष्य

मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 34.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी 16.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर रत्नागिरीतील मंडणगड, रायगडमधील सुधागड, श्रीवर्धन, रोहा, लोणावळा आणि चांदवड येथे प्रत्येकी 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानकडे जाताच राज्यात पावसाने पुन्हा दडी मारली आहे. ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number