Weather Alert: सप्टेंबर महिन्यात देखील पाऊस महाराष्ट्रातून गायब? हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आहे, असं असताना गणरायाच्या आगमनाला पावसाने सुट्टी मारलेली पाहायला मिळत आहे. राज्यात ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यात देखील पाऊस महाराष्ट्रातून गायब झाला आहे.

Weather Alert: सप्टेंबर महिन्यात देखील पाऊस महाराष्ट्रातून गायब? हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आहे, असं असताना गणरायाच्या आगमनाला पावसाने सुट्टी मारलेली पाहायला मिळत आहे. राज्यात ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यात देखील पाऊस महाराष्ट्रातून गायब झाला आहे. यावेळी राज्यात पावसाने उघडीप घेतली असली, तरी हवामान विभागाकडून दिलासादायक अपडेट आली आहे.

पुढील 2 दिवसांत कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश भागांत हवामानात मोठे उलटफेर जाणवण्याची शक्यता आहे. बहुतांश महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

यावेळी मुंबईसह पनवेल, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मागील अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याने या भागात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. अशातच मुंबईसह कोकणात, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता असून बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा- Weather Update: पुढील 4 दिवस महाराष्ट्राच्या हवामानात मोठा उलटफेर! कोकण ते विदर्भात पुन्हा टेन्शन वाढणार? तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

तसेच नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि धुळे या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत सध्या हवामान कोरडे आणि उष्ण आहे. तसेच घाटमाथा भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आल्याने हलक्या सरींची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता असली, तरी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. 

तसेच मराठवाड्यात पुढील दोन दिवसांनंतर काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र तरी देखील शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. उन्हाच्या चटक्यासह पावसाअभावी खरीप पिकांवर संकट निर्माण झाले असले तरी बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागांत उष्ण आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शेतकरी चिंतेत आलेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number