‘न्यायालयाच्या सूचनेचं पालन करुन निर्णय घेऊ’

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेतील असे निर्देश देत आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देतांना दिले आहे. मी अध्यक्ष आहे. त्यामुळे मी ठरवणार पक्ष कोणाचा आणि व्हीप कोणाचा लागू होणार, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांना अपात्र ठरवले त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे […]

‘न्यायालयाच्या सूचनेचं पालन करुन निर्णय घेऊ’

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेतील असे निर्देश देत आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देतांना दिले आहे. मी अध्यक्ष आहे. त्यामुळे मी ठरवणार पक्ष कोणाचा आणि व्हीप कोणाचा लागू होणार, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांना अपात्र ठरवले त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे उपाध्यक्ष या नात्याने झिरवळ यांनी तसा निर्णय घेतला आहे. नियमानुसार अध्यक्ष नसताना उपाध्यक्ष निर्णय घेतो. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नसेल तर विधानसभा सदस्य एकाची निवड करतात आणि त्याला निर्णय घेण्याचे अधिकार देतात. मात्र आता मी अध्यक्ष आहे. त्यामुळेच मी निर्णय घेणार, असे नार्वेकर यांनी सांगितले.

नार्वेकर म्हणाले, व्हीप हा राजकीय पक्षाचा लागू होतो. विधानसभेतील सदस्य व्हीप जारी करु शकत नाही हे सर्व तपासूनच निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. परिणामी सर्व बाजू तपासूनच निर्णय घेतला जाईल. तसेच कोणाचा व्हीप ग्राह्य धरावा आणि कोणाचा ग्राह्य धरु नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले नाही. मला सर्व तपासूनच निर्णय घ्यावा लागेल.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रेतवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे आदेशही न्यायालयाने दिले. त्यावर प्रतिक्रिया देताना नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number