Nagpur Rain : शाळेच्या मैदानावर पाणीच पाणी, जीव धोक्यात घालून चिमुकल्यांचा पाण्यातून प्रवास; नागपूरला यलो अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नागपूर : नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. शाळा सुरू असून मैदानात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना त्याचा सामना करावा लागला. परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने पाणी साचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळपासून नागपूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असून त्यामुळे सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. आज पावसाचा येलो अलर्ट असल्याने […]

Nagpur Rain : शाळेच्या मैदानावर पाणीच पाणी, जीव धोक्यात घालून चिमुकल्यांचा पाण्यातून प्रवास; नागपूरला यलो अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नागपूर : नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. शाळा सुरू असून मैदानात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना त्याचा सामना करावा लागला. परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने पाणी साचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळपासून नागपूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असून त्यामुळे सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. आज पावसाचा येलो अलर्ट असल्याने दुपारी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

हेही वाचा : Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत 16.95 लाख शेतकरी! 56 लाखांपर्यंत लाभार्थ्यांना मिळणार दिलासा; कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा

शहरात दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरू झालेल्या जोरदार पावसाने अख्खे शहर तुंबल्याचे चित्र आहे. दुपारी तीने वाजेपर्यंत शहरातील सर्व रस्त्यांवर जवळपास एक दोन फूट पाणी साचले असून नागरिक यात अडकले. परिणामी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणेही कठीण झाले. शाळांची मैदाने तलावात बदलली असून शेकडो विद्यार्थी शाळेत अडकले. काही विद्यार्थ्यांना दोराच्या सहाय्याने शाळेतून बाहेर काढण्यात आले. घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांत भीती पसरली. सलग दोन तासांपासून शहरात जोरदार पावसामुळे सोंमलवाडा, स्वावलंबीनगर, त्रिमुर्तीनगर, नरेंद्रनगर, मानेवाडा रोड, वर्धा रोड, छत्रपती चौक, मेडिकल चौक, इंदोरा चौक, प्रतापनगर चौकासह शहराच्या सर्वच रस्त्यांवर एक ते दोन फूट पाणी साचले. खामला येथील सोमलवार निकालस शाळेजवळ कंबरेपर्यंत पाणी साचले. सोमलवार निकालस आणि सोमलवार खामला अशा दोन शाळा तिथे आहे. दोन्ही शाळांचे विद्यार्थी, शिक्षक एकेरी वाहतूक असलेल्या या रस्त्यावर अडकले. या विद्यार्थ्यांना रस्सीच्या सहाय्याने गुडघाभर पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number