आता पाण्याची बाटली वाढीव दराने विकल्यास थेट तुरुंगवास

आता पाण्याची बाटली वाढीव दराने विकल्यास थेट तुरुंगवास

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एक लिटर पाण्याच्या बाटलीचा दर हा अनेक ठिकाणी वेगवेगळा असतो असा अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेलच. पण, आता पाण्याच्या बाटलीसाठी एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणं दुकानदारांना चांगलच महागात पडणार आहे.

 

 

कारण, आता एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणा-या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसंच, त्यांना तुरूंगाची हवाही खावी लागेल. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version