गडचिरोली जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात विशेषत: दक्षिण व दक्षिण-पूर्व भागात मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी झालेली असून गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती नद्यांच्या पाण्याची पातळी ही वाढत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने बरेच मार्ग बंद आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये १३ जुलैपर्यंत बंद असतील.भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर द्वारा दि. १० जुलै रोजी प्रसारित हवामान संदेशानुसार पुढील ७२ तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊसासह अत्याधिक पाऊसाची दाट शक्यता आहे. यामूळे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत पूरपरिस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये दिनांक ११ जुलै ते १३ जुलै, २०२२ पर्यंत विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. यात प्रतिबंधित बाबी दिनांक १३ जुलै, २०२२ पर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रतिबंधित राहतील. जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये सदर कालावधीत बंद असतील.
Gadchiroli | जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा | Marathi News