विठ्ठलनामात दुमदुमलं प्रतिपंढरपूर ओळखलं जाणारं वडाळ्याचं विठ्ठल मंदिर

विठ्ठलनामात दुमदुमलं प्रतिपंढरपूर ओळखलं जाणारं वडाळ्याचं विठ्ठल मंदिर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्याचं विठ्ठल मंदिर हरिनामाच्या गजरात न्हाऊन निघालं. विठूरायाच्या ओढीनं मुंबईच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी वारकरी भाविकांचा मेळा जमला होता.

 

ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही असे भाविक आणि वारकरी वडाळ्याच्या या प्रति पंढरपूरमध्ये विठूरायाचं दर्शन घेतात. ग्यानबा तुकारामाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर विठूमय झाला होता. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते विठूरायाला अभिषेक करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version