जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई विद्यापीठाचे निकाल यावर्षी वेळेवर लागू शकले नाहीत. याला प्रशासन जबाबदार असले तरी यावर राज्यपाल काय कारवाई करायची ते करतील असं वक्तव्य शिक्षण
मंत्री विनोद तावडेंनी केले.
विद्यार्थ्यांचं कमीत कमी कसं नुकसान होईल याची काळजी सरकार घेत असल्याचेही विनोद तावडे मुलुंडमध्ये संपन्न झालेल्या विद्यार्थी सत्कार आणि संवाद समारंभात
म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.