Dharashiv Viral Video : बाप्पाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा! पाथरूडमध्ये गणपती बाप्पाचा ‘चमत्कार’ पाहण्यासाठी भाविकांची झुंबड; व्हिडीओ चर्चेत

धाराशिवच्या पाथरूड गावातील ऐतिहासिक गणपती मंदिरात आज एक वेगळाच प्रकार पाहायला मिळत आहे. मंदिरातील दगडी गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांमधून गेल्या दोन तासांपासून पाणी येत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय.

Dharashiv Viral Video : बाप्पाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा! पाथरूडमध्ये गणपती बाप्पाचा ‘चमत्कार’ पाहण्यासाठी भाविकांची झुंबड; व्हिडीओ चर्चेत

धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरूड गावातील ऐतिहासिक गणपती मंदिरात आज एक वेगळाच प्रकार पाहायला मिळत आहे. मंदिरातील दगडी गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांमधून गेल्या दोन तासांपासून पाणी येत असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांजवळ पाण्याचे थेंब दिसू लागल्यानंतर ही माहिती काही वेळातच संपूर्ण गावात पसरली आणि बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली. 

मूर्तीच्या डोळ्यांतून पाणी येत असल्याचे पाहून अनेक भाविकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, अनेक भाविकांनी या घटनेचे दर्शन घेतले असून, काही भाविकांकडून याकडे श्रद्धेच्या भावनेने पाहिले जात आहे. हा प्रकार पाहण्यासाठी मंदिरात ग्रामस्थ आणि भाविकांची गर्दी होत असून, गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचे दृश्य पाहून नागरिक चकित झाले आहेत. 

हेही वाचा- PM Modi and Amit Thackeray: "महाराजांपेक्षा पंतप्रधान मोठे झालेत?" छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो; अमित ठाकरे आक्रमक

दरम्यान, हा प्रकार नेमका कशामुळे घडला, मूर्तीच्या दगडामध्ये ओलावा निर्माण झाला आहे का, मंदिरातील वातावरणातील आर्द्रता किंवा अन्य कोणते नैसर्गिक कारण यामागे आहे का, याची शास्त्रीय तपासणी होणे गरजेचे आहे. दरम्यान ही माहिती गावात पसरताच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली. नेमके गणेश उत्सवाच्या तोंडावर हा प्रकार समोर आल्याने ग्रामस्थांकडून हा प्रकार चमत्कार मानला जात आहे मात्र त्यामागील नेमके कारण तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, मूर्तीच्या डोळ्यांमधून नेमके पाणी कशामुळे येत आहे, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत कारण समोर आलेले नाही. ही घटना नैसर्गिक कारणामुळे घडली आहे की यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही. त्यामुळे सध्या ग्रामस्थ आणि भाविकांकडून या घटनेकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे. सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा सुरू झाली असून, पाथरूडमधील गणपती मंदिरात नेमकं काय घडलं, हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि भाविक मंदिराकडे गर्दी करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number