जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना सत्तेत राहूनही आपली भूमिका बदलतेय. आता शिवसेना अस्तित्व टिकवण्यासाठी आंदोलन करतेय. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे त्यांची अवस्था गजनी चित्रपटातील आमिर खानप्रमाणे झाल्याचे भासतेय अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
सरकारची निष्क्रियता राज्याला दिवसेंदिवस अधोगतीकडे घेऊन जात असून कर्जमाफी ही निव्वळ फसवणूक असल्याची म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.