Raigad Crime News : व्यावसायिक वादातून काँग्रेस अध्यक्षाच्या भावाची हत्या, जेसीबीच्या सहाय्याने धडक देत संपवलं; पोलीस आरोपीच्या शोधात

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे विजय उर्फ बाबू थळे (वय 50) याचा खून करण्यात आला. बुधवारी संध्याकाळी दगडखाणीच्या परिसरात ही घटना घडली. खून करण्यात आलेला विजय थळे हा अलिबाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनील थळे यांचा सख्खा भाऊ आहे. व्यावसायिक वादातून हा खून झाल्याचे सांगितले जाते. जेसीबीच्या धक्क्याने त्यांचा खून करण्यात आल्याचे सांगितले जाते. रात्री उशिरा त्यांचा […]

Raigad Crime News : व्यावसायिक वादातून काँग्रेस अध्यक्षाच्या भावाची हत्या, जेसीबीच्या सहाय्याने धडक देत संपवलं; पोलीस आरोपीच्या शोधात

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे विजय उर्फ बाबू थळे (वय 50) याचा खून करण्यात आला. बुधवारी संध्याकाळी दगडखाणीच्या परिसरात ही घटना घडली. खून करण्यात आलेला विजय थळे हा अलिबाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनील थळे यांचा सख्खा भाऊ आहे. व्यावसायिक वादातून हा खून झाल्याचे सांगितले जाते. जेसीबीच्या धक्क्याने त्यांचा खून करण्यात आल्याचे सांगितले जाते. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान, पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : Santosh Pandit : मध्यरात्री पुण्यातील यूट्युबर संतोष पंडितला अटक; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मापगाव परिसरातील टाकादेवी मंदिरानजीक असलेल्या दगडाच्या खाणीजवळ जेसीबीच्या सहाय्याने धडक देऊन जखमी केले. त्यामध्ये विजय थळे अर्थात बाबू यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विजय थळे यांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली असून, मारेकरांना तात्काळ अटक करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. विजय थळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात सायंकाळी आणल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number