भाज्यांनी गाठली शंभरी; गृहिणींचे बजेट कोलमडले

भाज्यांनी गाठली शंभरी; गृहिणींचे बजेट कोलमडले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एकीकडे इंधनावरचा सरचार्ज कमी केल्याने ते स्वस्त झालेत. पण, दुसरीकडे भाज्यांनी मात्र शंभरी गाठली.

 

भाज्यांच्या भाववाडीचा आलेख चढतात असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळाले.

 

भोपळा, सुरणसारखी भाजीही 20 ते 22 रुपये पाव किलो या भावाने विकली जात आहे.

 

टोमॅटोनं शंभरी पार केली आहे. मंगळवारी गेल्या 10 दिवसांपेक्षा भाज्यांचे दर सर्वाधिक होते आणि महिनाभरसुद्धा हे दर चढेच राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

मार्केटमध्ये येणाऱ्या भाज्या या परराज्यातून अधिक येतात. त्यामुळेही दरावर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे.

 

बाजारात नवीन पीक येईपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version