Chlorine Gas Leak : वसईत क्लोरीन गॅसची गळती; एकाचा मृत्यू, तर 18 जखमी

वसई पश्चिमेतील दिवामान परिसरात महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ क्लोरीन गॅसची गळती होऊन एकाचा मृत्यू आणि 18 जण जखमी झाले.

Chlorine Gas Leak : वसईत क्लोरीन गॅसची गळती; एकाचा मृत्यू, तर 18 जखमी

वसई पश्चिमेतील दिवामान परिसरात महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीखाली ठेवलेल्या क्लोरीन गॅस सिलेंडरमधून अचानक गळती झाल्याने रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली. या गळतीमुळे परिसरात काही मिनिटांतच भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुर्दैवाने देव कांतीलाल पारडीवाल (वय 59) यांचा क्लोरीन गॅसच्या तीव्र संपर्कामुळे मृत्यू झाला, तर 18 जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील चार जवानांचाही समावेश आहे. गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांत जळजळ आणि भोवळ अशी लक्षणे जाणवू लागली. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून त्यातील दृश्ये धक्कादायक आहेत. मृत देव पारडीवाल यांना खाजगी वाहनातून तातडीने रुग्णालयात नेण्याचे क्षणही या फुटेजमध्ये दिसतात.

हेही वाचा: T20 World Cup 2026: “प्रत्येक Final अहमदाबादलाच का?” 'T20 World Cup' निर्णयावरून आदित्य ठाकरे संतापले

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. गॅसचा प्रचंड धोका असूनही अग्निशमन दलातील जवान पंकज सातवी आणि स्वप्निल घाग यांनी स्वतःचा कसलाही विचार न करता ऑक्सिजन मास्क वापरुन क्लोरीनचा गळती करणारा सिलेंडर उचलला आणि तो सुरक्षित अंतरावर असलेल्या नाल्यामध्ये टाकून निष्क्रिय करण्यात यश मिळवले. त्यांच्या धाडसामुळे पुढील मोठी हानी टळली.

दरम्यान, जखमी झालेले चार अग्निशमन दलाचे जवान आणि 14 नागरिकांना तातडीने जवळील डिवाईन हॉस्पिटल आणि डीएम पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्वांवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयांनी सांगितले आहे. या अचानक झालेल्या क्लोरीन गॅस गळतीने वसई परिसर हादरला असून स्थानिक प्रशासनाने पुढील काही तासांसाठी सावधगिरीचा सल्ला दिला आहे. घटनास्थळी तांत्रिक पथकांनी तपास सुरू केला असून गळतीचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा: Constitution Day India 2025: पंतप्रधान मोदींची संविधान सदनातील मुख्य कार्यक्रमाला उपस्थिती; जाणून घ्या संविधान दिनाचे महत्त्व आणि इतिहास

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number