Nashik Accident: वणी-सापुतारा महामार्गावर काळाचा घाला! दुचाकीला क्रेटाची जोरदार धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू

Synopsis:<br/>वणी-सापुतारा महामार्गावर पांडाणे येथील देवनदी पुलावर दुचाकी आणि क्रेटा कारची भीषण धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले आहेत.

Nashik Accident: वणी-सापुतारा महामार्गावर काळाचा घाला! दुचाकीला क्रेटाची जोरदार धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिकच्या वणी-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावर दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील देवनदी पुलाजवळ दुचाकी आणि क्रेटा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार मंगेश पांडू खराटे (वय ३५, रा. खोबळा, ता. सुरगाणा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील आणि दुचाकीवरील मिळून चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खोबळा येथून वणीच्या दिशेने दुचाकी येत होती. त्याचवेळी वणीकडून सापुताऱ्याकडे क्रेटा कार जात होती. पांडाणे येथील देवनदी पुलावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. काही वेळातच संपूर्ण दुचाकी आगीत जळून खाक झाली. तर क्रेटा कारच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताच्या कारणाचा अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number