कर्जमाफी आता फॅशन झालेय; केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंचे वादग्रस्त वक्तव्य

कर्जमाफी आता फॅशन झालेय; केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंचे वादग्रस्त वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कर्जमाफी आता फॅशन झाली आहे असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंनी मुंबईत केले.

 

परिस्थिती अतिशय बिकट असेल, तरच कर्जमाफी द्यायला हवी. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही.

 

कर्जमाफी म्हणजे आजकाल फॅशन झाली आहे असे विधान व्यंकय्या नायडूंनी एका कार्यक्रमात केले.

 

बँकेतील पैसा हा जनतेचा आहे याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीकासुद्धा त्यांनी केली.

 

त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी चांगलाच समाचार घेतला आहे.

 

कर्जमाफीला फॅशन म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाचा अपमान असल्याचं मत रावतेंनी व्यक्त केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version