‘सरकारची कर्जमाफी फसवी’ म्हणत त्याने कर्जमाफीचे प्रमाणपत्र प्रशासनाला परत केले

जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद शेतीसंदर्भातील कर्जमाफीत फसवणूक झाल्याचा आरोप करत उस्मानाबादच्या एका शेतकऱ्याने कर्जमाफीचे प्रमाणपत्र प्रशासनाला परत केले आहे. भारत तांबे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.  त्यांचा 18 तारखेला सहपालकमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते सत्कार झाला होता. तसेच त्यावेळी त्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्रदेखील प्रदान केले होते. तांबे यांच्या नावे 1 लाख 40 हजार रुपयांचे कर्ज असून […]

‘सरकारची कर्जमाफी फसवी’ म्हणत त्याने कर्जमाफीचे प्रमाणपत्र प्रशासनाला परत केले

जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद

शेतीसंदर्भातील कर्जमाफीत फसवणूक झाल्याचा आरोप करत उस्मानाबादच्या एका शेतकऱ्याने कर्जमाफीचे प्रमाणपत्र प्रशासनाला परत केले आहे. भारत तांबे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.  त्यांचा 18 तारखेला सहपालकमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते सत्कार झाला होता. तसेच त्यावेळी त्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्रदेखील प्रदान केले होते. तांबे यांच्या नावे 1 लाख 40 हजार रुपयांचे कर्ज असून त्यांना प्रत्यक्षात 10 हजार रुपयांची कर्ज माफी मिळाली. आपली फसवणूक झालीये. पूर्ण कर्जमाफी मिळालेली नाही असे सांगत आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन कर्जमाफीचे प्रमाणपत्र परत केलंय. सोबत त्यांनी मुख्यमंत्र्याना निवेदनही सादर केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number