टॅरिफ वाढीचा फटका थेट महाराष्ट्राला ; 5 हजार कोटींचे नुकसान ?

नव्या निर्णयामुळे कोल्हापूरला दोन हजार कोटी, तर सांगलीला दीड हजार कोटींचा फटका बसणार आहे.

टॅरिफ वाढीचा फटका थेट महाराष्ट्राला ; 5 हजार कोटींचे नुकसान ?

सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे देशाबरोबरच महाराष्ट्रातील उद्योग आणि कृषी क्षेत्राला मोठा दणका बसला आहे. कोल्हापूर आणि सांगलीतून अमेरिकेमध्ये अनेक वस्तू्ंची निर्यात केली जाते. मात्र आता निर्यात शुल्क वाढवल्यामुळे तब्बल पाच हजार कोटींहून जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. 

दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली तसेच शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातून अमेरिकेला विविध वस्तूंची निर्यात होते.डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूवरील आयात शुल्क 25 आणि 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला. मात्र  केवळ कोल्हापुरातून यातून दोन वर्षांत अमेरिकेला तब्बल तीन हजार 834 कोटींची निर्यात झाली आहे.

मात्र आता 10 टक्के असलेले आयात शुल्क थेट 50 टक्क्यांवर पोहोचणार आहे. याचा फटका भारतीय मालाला बसणार आहे. नव्या निर्णयामुळे कोल्हापूरला दोन हजार कोटी, तर सांगलीला दीड हजार कोटींचा फटका बसणार आहे.

महाराष्ट्रातून कोणत्या वस्तूंची निर्यात : 

सांगली जिल्ह्यातील हळद आणि बेदाणे जगभर प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे ऑटोमोटिव्ह, मशिनचे भाग, इंजिनसाठी लागणारे कास्ट आयर्नमध्ये तयार केलेले सुटे भाग याबरोबरच कोल्हापुरी दागिने, चप्पल, दुग्धजन्य पदार्थ यांचा यामध्ये समावेश आहे. इचलकरंजीतील  कापडाबरोबरच शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील कापड अमेरिकेला पाठवले जाते. त्यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तूंना मोठी बाजारपेठ उपलब्ध असलेली पाहायला मिळते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number