Central Railway: मध्य रेल्वेवर पुन्हा थरार! डोंबिवली लोकलच्या टपावर चढला इसम, कांजूरमार्गात ट्रेन थांबवून…

मध्य रेल्वेच्या डोंबिवली लोकलच्या छतावर अज्ञात इसम चढल्याने रेल्वे पोलिसांची धावपळ उडाली. कांजूरमार्ग स्थानकात ट्रेन थांबवून त्याला सुरक्षित खाली उतरवण्यात आले. सुदैवाने जीवितहानी टळली.

Central Railway: मध्य रेल्वेवर पुन्हा थरार! डोंबिवली लोकलच्या टपावर चढला इसम, कांजूरमार्गात ट्रेन थांबवून…

मध्य रेल्वेच्या मार्गावर लोकलच्या छतावर चढण्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी घाटकोपर स्थानकात घडलेल्या घटनेनंतर आता पुन्हा एका अज्ञात व्यक्तीने लोकलच्या टपावर चढल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटीहून सायंकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी डोंबिवलीच्या दिशेने लोकल रवाना झाली. या लोकलच्या छतावर एक व्यक्ती चढल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्यक्ती विक्रोळी स्थानक परिसरात लोकलच्या छतावर गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली.

लोकल पुढे जात असताना रेल्वे पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांची हालचाल सुरू झाली. छतावर असलेल्या व्यक्तीमुळे ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून लोकलला कांजूरमार्ग स्थानकात थांबवण्यात आले.

हेही वाचा: Crime News: वसतिगृहातील कारवाईचा सूड अन् पैशांची हाव; 10 वीच्या 2 विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेला 27 वेळा चाकूने वार करून संपवलं

ट्रेन स्थानकात थांबल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत त्या व्यक्तीला लोकलच्या छतावरून सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकात दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती. लोकलच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला ओव्हरहेड वायरचा धक्का बसला होता. या घटनेमुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती आणि पिकअवरमध्ये प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला होता.

या पार्श्वभूमीवर पुन्हा लोकलच्या टपावर चढण्याचा प्रकार घडल्याने रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोकलच्या छतावर चढणे अत्यंत धोकादायक असून, ओव्हरहेड वायरमधील उच्चदाबाच्या वीजप्रवाहामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी अशा धोकादायक प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number