जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
समृद्धी महामार्गवरून शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. शेतकऱ्यांना थेट मोबदला मिळावा आणि त्यांच्या सुपीक जमिनी जाऊ नये असं सांगत उद्धव ठाकरेंनी समुद्धी महामार्गासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
तसंच शिवसेनेची भूमिका याआधीच ठाम असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. विकासकामांना आमचा विरोध नाही. शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूनं असून शिवसेनेला विकासही महत्त्वाचा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.