मराठा समाजाच्या आरक्षणावर उध्दव ठाकरे यांची बैठक संपली…

मराठा समाजाच्या आरक्षणावर उध्दव ठाकरे यांची बैठक संपली…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठा आरक्षणाबाबत आज उद्धव ठाकरेंनी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती. गृहराज्यमंत्री आणि सेनेचे नेते दीपक केसरकर यांच्यासह सेनेचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीनंतर दुपारी 4 वाजता सेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ सोडविण्याबाबत निवेदन केले.

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज उद्धव ठाकरेंनी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती. गृहराज्यमंत्री आणि सेनेचे नेते दीपक केसरकर यांच्यासह सेनेचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीनंतर दुपारी 4 वाजता बैठकीला उपस्थित सेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

या भेटीदरम्यान त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ मार्गी लावण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली. कुठल्याही अहवालाची वाट न पाहता, विशेष अधिवेशन बोलवावे असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दरम्यान उपस्थित सेनेच्या सर्व आमदारांना मराठा समाजाच्या आरक्षण मुद्यावर तातडीने निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

मराठा आरक्षणावर उध्दव ठाकरे यांची बैठक

  • आरक्षणासंदर्भात आज उद्धव ठाकरेंनी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली
  • गृहराज्यमंत्री आणि सेनेचे नेते दीपक केसरकर यांच्यासह सेनेचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित
  • बैठकीनंतर दुपारी 4 वाजता सेनेच्या सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांना भेट
  • भेटीदरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ मार्गी लावण्याची निवेदनाद्वारे मागणी
  • तसेच कुठल्याही अहवालाची वाट न पाहता, विशेष अधिवेशन बोलवावे असे निवेदन
  • मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी सेनेची मागण
  • मराठा समाजाच्या आरक्षण मुद्यावर तातडीने निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version