उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना

बारूस आंदोलकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे शनिवारी बारसू दौऱ्यावर आहेत. याठिकाणी उद्धव ठाकरे बारसू प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांची भेट घेणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या याठिकाणी होणाऱ्या सभेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना झाले आहेत. आंदोलकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे  शनिवारी बारसू दौरा करणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या येथील […]

उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना

बारूस आंदोलकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे शनिवारी बारसू दौऱ्यावर आहेत. याठिकाणी उद्धव ठाकरे बारसू प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांची भेट घेणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या याठिकाणी होणाऱ्या सभेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना झाले आहेत.

आंदोलकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे  शनिवारी बारसू दौरा करणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ठाकरे गटाने रानतळे येथे सभेचे नियोजन केले होते. प्रशासनाने रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी दिली आहे. मात्र, सभा घेता येणार नाही असे निर्देश प्रशासनाने उद्धव यांना दिले आहेत. उद्धव ठाकरे शनिवारी बारसूत सोलगाव फाट्यावर देवाचे गोठणे, गोवीळ आणि गिरमादेवी कोंड या ठिकाणी परिसरातील विरोधकांची भेट घेणार आहे. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास गिरमादेवी कोंड इथे उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. या दौऱ्यात विरोधकांसोबतच रिफायनरीचे समर्थकही ठाकरेंची भेट घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे स्थानिकांशी संवाद साधणार असून बाराच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत.

दरम्यान, रत्नागिरीतील बारसू प्रकल्पावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतली आहे. शरद पवारांनी बारसू प्रकल्प करताना लोकांना विश्वासात घेण्याचे आवाहन केले. तर, उद्धव गटाने बारसू प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे मविआमध्ये बारसू प्रकल्पावरून विरोधी भूमिका दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number