उस्मानाबाद, १९ मे २०२३, प्रतिनिधी : तुळजाभवानी मंदिरात प्रवेशासाठीचा पारंपारिक कपड्यांचा निर्णय मंदिर संस्थान कडून मागे घेण्यात आलाय.
तुळजाभवानी मंदिरात आता अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्री अर्थात प्रवेश बंदी करण्यात आली होती. मात्र अवघ्या काही तासात हा निर्णय बदलण्यात आला आहे. तसे जाहीर प्रगटण तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक प्रशासनाने काढले आहे. मात्र आता तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत, असे मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे.
मंदिर परिसर मंदीर संस्थानने मंदीर परिसरात वेस्टर्न कपडे नो एन्ट्री असे फलक लावले होते मात्र अवघ्या काही तासात हा निर्णय बदलण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीचा हवाला देत मंदिर संस्थान हा निर्णय घेतला होता या निर्णया वर पुजारी व भाविक संमिश्र प्रतिक्रिया देत होते तर तृप्ती देसाई यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला होता.