ऐन सणासुदीत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! मिठाईवर आता फक्त शुद्ध चांदीचा वर्क, नेमकं काय म्हणाले?

मुंबई: विविध धर्मिय लोक एकत्र राहत असल्यामुळे महाराष्ट्राला अनेक सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या आहेत.

ऐन सणासुदीत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! मिठाईवर आता फक्त शुद्ध चांदीचा वर्क, नेमकं काय म्हणाले?

मुंबई: विविध धर्मिय लोक एकत्र राहत असल्यामुळे महाराष्ट्राला अनेक सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या आहेत. याबरोबरच सण-उत्सवांमध्ये देखील विविधता आढळून येते. यात उपवासाचे पदार्थ, नैवेद्य, प्रसाद यांची लगबग वर्षभर असते. त्यामुळे राज्यात अन्नभेसळ रोखण्यासाठी FDA ने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

याअंतर्गत प्रत्येक सणासाठी वेगळा आदेश न काढता, वर्षभरासाठी एकच स्थायी कार्यप्रणाली लागू केली जाणार आहे. 3 सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात हे वर्षभराचे नियोजनबद्ध 'फूड सेफ्टी कॅलेंडर' तयार करण्यात आले आहे. सण कोणताही असो, राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका तुकाराम मुंढे यांनी मांडली आहे.

 

हेही वाचा – Tukaram Mundhe : “एक्सपायरी डेट…किती आणि कशी महत्त्वाची"?; आयुक्त तुकाराम मुंढेंनी दिली ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती, पोस्ट शेअर

 

 

स्थायी कार्यप्रणालीतील निर्णय कोणते ? 

• मिठाई आणि चांदीचा वर्क: सणांच्या काळात विक्री होणाऱ्या मिठाईत केवळ शुद्ध चांदीचाच वर्क वापरला गेला पाहिजे, असा कडक नियम करण्यात आला आहे.

• दुग्धजन्य पदार्थ: सणांच्या काळात दुधाची मोठी मागणी असते. त्यामुळे पहाटेच्या वेळी होणाऱ्या दुधाच्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाहतुकीचा मागोवा घेऊन अचानक छापे टाकले जातील.

• मकर संक्रांती व होळी: संक्रांतीला लागणारा तीळगूळ आणि होळी-ईदच्या काळात बनवला जाणारा मालपुआ व इतर मिठायांवर विशेष नजर असेल.

•उपवासाचे पदार्थ: महाशिवरात्री व इतर उपवासाच्या काळात भगर, साबुदाणा, कुट्टू आणि राजगिरा यांसारख्या पदार्थांचे उत्पादन नेमके कुठे होते, यावर थेट लक्ष ठेवले जाईल. बुरशीजन्य विषबाधा घडवून आणणाऱ्या अन्नपदार्थांच्या तपासणीला प्राधान्य दिले जाईल.

• ईद आणि मांस-बर्फ तपासणी: ईदसारख्या सणांमध्ये मांस, पाणी आणि बर्फाचा वापर वाढतो. यासाठी कत्तलखाने, बर्फ तयार करणारे कारखाने आणि बर्फ गोळा विक्री केंद्रांची कडक तपासणी होईल.

• सणांच्या काळातील महाप्रसाद, भंडारा, लंगर यांवर आता FDA चे विशेष लक्ष असणार आहे.

• आयोजकांना कार्यक्रमापूर्वी FDA ला पूर्वकल्पना देणे बंधनकारक असून  त्यांना अन्नसुरक्षेचे प्रशिक्षण घ्यावे लागेल.

 

या नव्या स्थायी आदेशांमुळे FDA ला भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर वर्षभर कडक कारवाई करणे शक्य होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number