राज्यातील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पावलं उचलली आहेत. राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभारावर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. काही ठराविक औषधांच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या आदेशावर मुंबई उच्चन्यायालयाने FDA ला निर्देश दिले. यादरम्यान FDA च्या कारवाईला कॅडिलाने याचिका दाखल करत आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला ‘विवेकबुद्धीने’ निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर आता औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 आणि त्याअंतर्गत ‘शेड्युल टी’ मधील ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस’ नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या 10 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे परवाने एफडीएने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. यादरम्यान राज्यभरातील तब्बल 434 आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीत नियमांचे पालन न करणाऱ्या 135 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर 10 आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहेत.
हेही वाचा- मोठी बातमी! मुंबईत FDA ची धडक कारवाई; मालाडमधील Blinkit गोदामाला टाळं
FDA ला तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी
FDA ने कायमस्वरूपी परवाने रद्द केलेल्या 10 संस्था
1. कृष्णा हर्बल – बारामती, पुणे
2. लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स – करंजा, गोंदिया
3. आदित्य फार्मा – वडेगाव, तिरोडा, गोंदिया
4. अंगरस आयुर्वेद – वडेगाव, तिरोडा, गोंदिया
5. कालिदास गांधी – पुणे
6. शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी – सिन्नर, नाशिक
7. इंडुकेअर फार्मा प्रा. लि. – जेजुरी एमआयडीसी, पुरंदर, पुणे
8. हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर – अमरावती
9. हिलॅरियस आयुर्वेद – एमआयडीसी मुंडीपार, गोंदिया
10. यशोदा लॅब प्रा. लि. – नाशिक रोड, नाशिक